रायगड: रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचाराने जोर धरला आहे. रायगड लोकसभेतील पेण शहरात महायुतीच्या नेत्यांनी जोरदार रॅली काढत खासदार सुनिल तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रचारयात्रेत सहभागी होतअनिकेत तटकरे यांनी रॅलीच्या अगोदर पेण शहरातील प्रसिद्ध कोळटकर गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवला. त्यानंतर शहरातून ढोलताशांच्या गजरात रॅली काढत प्रचारपत्रके वाटण्यात आली. यादरम्यान पेण बाजारपेठेत असणार्या सर्व देवस्थानांमध्ये जात महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकरतींनी तटकरे साहेबांना विजयी करण्याचे साकडे घातले. त्याचबरोबर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी, कोळीबांधवांशी संवाद साधत घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन अनिकेत तटकरे यांनी केले.
या रॅलीमध्ये महायुतीच्या नेत्यांवर फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. या रॅलीमध्ये जनतेचा उत्स्फूर्त सहभाग होता.
या प्रचार रॅलीत माजी मंत्री आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.