रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केलीय. दोन्ही नेते आता एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी करतांना दिसत आहेत. अशातच पत्रकारांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या बाबत अनंत गिते यांनी हसून देत उत्तर टाळलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
विरोधकांकडून सातत्याने असा प्रचार केला जातोय की, गेले पाच वर्ष अनंत गिते कुठे दिसले नाहीत ? महाडचा महापुर, कोरोनाचा संकट आलं. चक्रिवादळ आला, यामध्ये अनंत गिते कुठेच दिसले नाहीत ? या प्रश्नावर अनंत गिते यांनी हसून उत्तर देणे टाळले. तर हसण्या पलिकडेच या गोष्टीची कुठेही दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यांच्या या टिकेबद्दल मी मनापासून हसतोय. मला त्याचा आनंद होतोय. असं उत्तर अनंत गिते यांनी दिलं आहे.
अनंत गिते यांच्या या कृतीवर आता अजित पवार यांनी जोरदार टिका केली आहे. सर्वसामन्यांच्या दुखावर आणि ओढावलेल्या संकटावर निर्दयीपणे हसण्या इतपत निर्लज्ज नेत्याला रायगडची जनता जिल्ह्याच्या नकाशावरून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देखील अजित पवार गटाने अनंत गिते यांना दिला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांनी आपला प्रचार जोरात सुरू केला आहे. तटकरे यांच्याकडून सध्या कोपरा सभा, बैठका, कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर सभांवर भर दिला आहे. त्यांच्यासमोर माजी मंत्री अनंत गिते यांचं मोठं आवाहन असणार आहे. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.