Latest Marathi News

BREAKING NEWS

प्रचाराचे मुद्दे संपल्याने विरोधकांनी संविधान बचाव नावाने ओरड सुरू

0

रायगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याक समाजासाठी केलेले काम, नारी शक्तीसाठी घेतलेले निर्णय घेतला. तसेच पायाभूत सुविधा व इतर महत्त्वपूर्ण निर्णय लक्षात घेता सध्या विरोधकांकडील प्रचाराचे मुद्दे संपल्याने विरोधकांनी संविधान बचाव नावाने ओरड सुरू केली आहे. विरोधकांची प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणली आहे. अशी खंत रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अलिबाग शहर कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, विरोधकांकडून संविधान बचावच्या नावाने वातावरण दूषित केले जात आहे. मात्र देशातील जनता सुज्ञ आहे. देशाला विकासाच्या प्रगतीपथावर कोण नेत आहे याची जाण जनतेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम आपण केले घराघरात पोचवायचे आहे. भविष्यात नविन मतदारांना मतदानासाठी आणावे लागेल आणि त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.

अर्ज दाखल करताना ‘जिंकायचेच’ या उत्स्फुर्तपणे महायुतीचे लोक आले होते. त्याबद्दल कौतुक करतानाच आता कुणीही गाफील राहू नये. सतर्कने घराघरात घड्याळ हे चिन्ह पोचवायचे आहे. ग्रामीण भागात आपली पकड घट्ट आहे परंतु शहरात आपल्याला ताकदीने काम करावे लागणार आहे. असेही यावेळी सुनील तटकरे यांनी सांगितले. या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, महेश मोहिते, आदींसह महायुतीचे शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.