Latest Marathi News

BREAKING NEWS

राहुल गांधींची सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का? राज ठाकरे संतापले

0

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी मिळेल तो हात हातात घेतला आणि नंतर ते कोपऱ्यात जाऊन बसले, अशी टीका राज ठाकरेंनी केली. यासोबतच त्यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. ते बोलतात तेव्हा मागून आरडी बर्मन बोलतात का असे वाटते. त्यांची सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का? त्यांना ते कोण आहेत हे तरी माहिती आहे का? त्यांना कुठे ठेवले होते, त्यांनी काय हाल सहन केले. एक स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते. आम्ही त्याचा विचार करत नाही. सर सलामत तो पगडी पचास, असे ते राहुल गांधींना उद्देशून म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, कृष्ण निती काय सांगते. चांगली गोष्ट जर घडणार असेल, तर त्यासाठी खोटे बोलावे लागले तर बोला, पण ती गोष्ट होणे गरजेचे आहे, असे राज ठाकरेंनी सांगितले. काँग्रेसला जसे सांगणे आहे तसे भाजप आणि अन्य लोकांनाही सांगणे आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ज्यांना महापुरूष म्हटले गेले, आयकॉन झाले, यांची बदनामी करून काय हाती लागणार? असा प्रश्नही राज ठाकरेंनी केला.

तसेच सत्तारांनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेचा सुद्धा समाचार घेतला. राज्यातील एक मंत्री महिला नेत्याला भिकार.. असे म्हणतो, असे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याची लायकी काय? आपण बोलतोय काय? असे म्हणत राज ठाकरेंनी सत्तारांना फटकारले. महिला नेत्यांना टीव्हीवर शिव्या देता हीच आपली संस्कृती आहे का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच यायला राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधताना राहुल गांधी यांचा गधड्या असा उल्लेख केला.

Leave A Reply

Your email address will not be published.