Latest Marathi News

BREAKING NEWS

राहुल गांधींविरोधात सर्व विरोधक आक्रमक तर काँग्रेसचे ‘माफीवीर’ फ्लेक्स

0

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्या वीर सावरकरांबाबतच्या वक्तव्यानंतर आता राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झालेत. तर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलीय. पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावलेत.

राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे फ्लेक्स लावलेत. सारसबाग चौकातील सावरकरांच्या पुतळ्यासमोरच काँग्रेसने राहुल गांधींनी दिलेल्या पुराव्याचे हे फ्लेक्स लावलेत. त्यावर संतापलेल्या सावरकर समर्थकांनी काँग्रेसचे हे पोस्टर फाडून टाकले.

जितेंद्र वाघ नावाच्या एका सावरकर प्रेमीने पुण्यात लावलेले हे बॅनर फाडलेत. बुलढाण्याच्या शेगावमध्ये आज राहुल गांधींची सभा होणार आहे…भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आज 11 वा दिवस आहे. दुपारी पावणे चारच्या सुमारास शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधींची सभा होणार आहे. या सभेत राहुल गांधी कोणावर निशाणा साधणार, ते आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं करणा-या राहुल गांधी यांना मनसे आज काळे झेंडे दाखवणार आहे. राहुल गांधी यांच्या शेगाव इथल्या सभेआधी मनसे आंदोलन करणार आहे. काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्याचे आदेश स्वतः राज ठाकरेंनी दिले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही. निषेध होणारच असा इशारा देण्यात आलाय. मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि पदाधिकारी संभाजीनगरातून शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. याशिवाय मुंबईवरूनही मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी रवाना झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.