Latest Marathi News

BREAKING NEWS

जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला सोडचिठ्ठी

0


दोन माजी मंत्री, माजी आमदार अजित पवार गटात
जळगाव : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अनेक पदाधिकारी शरद पवार यांची साथ सोडत आहेत. शरद पवार यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. शरद पवार गटात असणारे दोन माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह एक महिला प्रदेश सरचिटणीस यांचा आज अजित पवार गटात प्रवेश झाला. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जळगाव जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात शरद पवारांची अर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे दोन माजी मंत्री शरद पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली. तसेच माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील यांनीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनीही अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला.

मुंबईत दुपारी दोन वाजता अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. प्रवेश सोहळ््यासाठी पदाधिकाºयांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मंगल कलश यात्रेच्या माध्यमातून शरद पवार गटातील पदाधिकाºयांचे मन वळवत शरद पवार यांना जोरदार झटका दिला.

जळगाव, धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना गळाला लावण्यात आमदार अनिल पाटील यांना यश आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधील पदाधिकारीसुद्धा शरद पवार यांची साथ सोडत आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही अनेक कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. उमेश पाटील यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे पाठवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.