Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ मॅगझिनचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

0

मुंबई |

वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते वस्त्रोद्योगाबद्दल परिपूर्ण माहिती असणाऱ्या मॅगझिनचे प्रकाशन त्यांच्या सिंहगड या मुंबईतील शासकीय निवासस्थानी करण्यात आले.

महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला आपली व्याप्ती, गुणवत्ता, गती आणि उत्पादन वाढवण्यावर चंद्रकांतदादा पाटील यांनी भरीव कार्य केले आहे. जी २० परिषदेतही वस्त्रोद्योगाचे ब्रँडिंग करण्यात आले होते. आज वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मॅगझिनमध्ये वस्त्रोद्योग (टेक्स्टाईल) संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

हे मॅगझिन मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. हे मॅगझिन दर तीन महिन्याला प्रकाशित करण्यात येणार आहे. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्रजी सिंग, उपसचिव श्रीकृष्णजी पवार संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.