Latest Marathi News

BREAKING NEWS

प्रियांका चोप्राने दाखवला मुलीचा चेहरा; खूपच सुंदर दिसते ‘ प्रियांकाची लेक

0

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास ही जोडी बॉलिवूडसह हॉलीवूडमध्ये देखील खूप चर्चेत असते. म्हणूनच प्रियंकाने केलेल्या पार्टीपासून ते कपड्यांच्या हटके स्टाईलची चाहत्यांना माहिती हवी असते. नुकतंच प्रियांकाने एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या लेकीचा चेहरा सर्वांना दाखवत जगाला तिची ओळख करुन दिली आहे. सध्या प्रियांका-निक यांच्या लेकीचा हा फोटो सगळीकडे व्हायरल होत असून, यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

अनेक दिवसांपासून चाहत्यांना प्रियांकाच्या लेकीला पाहण्याची उत्सुकता होती. मात्र आता प्रियांकाने स्वतः आपल्या लेकीचा चेहरा जगासमोर उघड केला आहे. प्रियांकाने एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान आपल्या लेकीला घेऊन गेलेला व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मुलगी मालतीचा चेहरा स्पष्ट दिसून येत आहे. सध्या तिचे मुलगी एक वर्षाची झाली असून, अतिशय गोड आणि सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री सध्या हॉलिवूडमध्ये आपली जादू पसरवत आहे. प्रियांकाने हॉलिवूडमध्ये चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री आंतराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. प्रियांका चोप्रा अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असली तरी तिचे चाहते तिला पडद्यावर प्रचंड मिस करत असतात. सोशल मीडियावर देखील प्रियांकाचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.