Latest Marathi News

BREAKING NEWS

प्रजासत्ताक दिनी भारताचा झेंडा न फडकवत पाकिस्तानचा झेंडा फडकावला, वाचा कुठे घडली घटना !

0

संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बिहारमधील पूर्णिया येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शहरालगत असलेल्या मधुबनी सिपाही टोला परिसरात पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आला आहे. मशिदीला लागून असलेल्या एका घरात पाकिस्तानी ध्वज फडकताना दिसला. देशद्रोहाशी संबंधित हे प्रकरण मधुबनी टॉप पोलिस स्टेशन हद्दीतील आहे. पोलीस दलासह मीडिया टीम घटनास्थळी पोहोचल्या नंतर पोलिसांनी घरावरील पाकिस्तानी ध्वज हटवला.

या प्रकरणी पोलीस स्टेशन प्रमुख पवनकुमार चौधरी म्हणाले, ‘या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचले. ध्वज काढण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत एसडीओ पूर्णिया यांना कळविण्यात आले असून त्यांच्याशी यावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांनुसार पुढील कारवाई केली जाईल. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

‘घरमालकाचे नाव मोहम्मद मुबारुकदीन असे आहे. या संदर्भात घरातील महिला सदस्याने सांगितले की, हा पाकिस्तानचा ध्वज आहे हे मला माहीत नव्हते. हा ध्वज आज सकाळी माझ्या पुतण्याने फडकवला. मी त्याला धार्मिक ध्वज समजत होते. जर असे असेल तर ते चुकीचे आहे, असे त्या महिलेने मान्य केले. मुबारुकदीन शहरातील माधोपाडा भागात एक खासगी शाळा चालवतात. ही बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मधुबनी टीओपी पोलीस स्टेशनचे स्टेशन हेड पवन कुमार चौधरी यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळताच ते संशयिताच्या घरी पोहोचले. ध्वज काढण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत एसडीओ पूर्णिया यांच्याशी चर्चा झाली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल. सध्या हा झेंडा पाकिस्तानी आहे की नाही, याचा तपास सुरू आहे. घरात हा झेंडा कुठून आला आणि तो लावण्यामागचा हेतू काय होता, याचाही तपास पोलीस करत आहेत. त्याचवेळी या घटनेनंतर स्थानिकांमध्ये नाराजी आ

Leave A Reply

Your email address will not be published.