Latest Marathi News

BREAKING NEWS

पोलिसांच्या ‘त्या’ निर्णयामुळे ठाकरे गटाला सभेपूर्वीच मोठा धक्का

0

पाचोऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सभा होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेला साम्भोडीत करणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जळगावात पोहोचेले आहेत. उद्या होणाऱ्या सभेनिमित्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे भव्य बॅनर लावून शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. मात्र हे बॅनर पोलिसांकडून हटवण्यात आल्यानं सभेपूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

रविवारी पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेनिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतार्थ हे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र जळगावात लावण्यात आलेले बॅनर पोलिसांकडून हटवण्यात आले आहेत. अवैध बॅनरवरून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे बॅनर हटवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सभेपूर्वीच राजकारण तापलं दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच जळगावचं वातावरण तापलं आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसण्याचा इशारा दिला होता, त्यानंतर सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचं बक्षिस जिंका असं चॅलेंज ठाकरे गटाकडून गुलाबराव पाटील यांना देण्यात आलं आहे. मात्र अद्यापही उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या चॅलेंजवर गुलाबराव पाटलांनी तसेच शिंदे गटाने प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.