Latest Marathi News

BREAKING NEWS

पंतप्रधान मोदींनी केलं शाहरुखच्या पठाणचं संसदेत सर्वांसमोर कौतुक

0

नवी दिल्ली | अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या वादावादीनंतर अखेर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्‍स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.

25 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्‍स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले असल्याचं दिसून आलं आहे. अश्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संसदेत सर्वांसमोर पठाण सिनेमा आणि अभिनेता शाहरुख खान याच विशेष कौतुक केलं आहे. एकीकडे मुलगा ड्रग्सच्या प्रकरणात असलेला असताना त्याने मीडियाला दिलेल्या उत्तेरने त्याने सर्वांची माने जिंकून घेतली होती अखेर त्याच्या मुलाची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याने पठाण चित्रपटाच्या प्रोमोशनकडे विशेष लक्ष दिले होते.

यावेळी मोदी म्हणाले, ‘श्रीनगरमध्ये अनेक दशकांनंतर चित्रपटगृहे हाऊसफुल्ल आहेत. पठाण पाहण्यासाठी काश्मीर मधील नागरिकांनी तीन दशकांनंतर हाउसफुल्ल गर्दी असून, चित्रपटगृह तब्बल 32 वर्षांनी हाउसफुल झालं असल्याचं दिसून आलं. काश्मीर सारख्या संवेदनशील ठिकाणी पठाण हाऊफुल्ल होणं हि फार मोठी गोष्ट होती…’ असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी अभिनेता शाहरुख खान याच कौतूक केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.