Latest Marathi News

BREAKING NEWS

 पंकजा मुंडेंना मोठे पद मिळेल; शिंदे गटाच्या मंत्र्यांचं मोठं विधान 

0

 

 

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता १७ ऑगस्टपासून विधिमंडळाचे अधिवेशन राहणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच मंत्र्यांचे खाते वाटप होईल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे व्यक्त केला. यासोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत व सिंचनासह रस्ते, वीज, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

गिरीश महाजन यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी जळगाव येथे त्यांचे रेल्वेने आगमन झाले. यावेळी महाजन यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालादेखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या विषयांवर टीका केली. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास खुंटला आहे. आता मंत्रीपद मिळाल्याने मोठी जबाबदारी वाढली आहे. राज्यात सिंचन, रस्ते, वीज, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध समस्या आहे. सोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यास प्राधान्य राहणार असल्याचे गिरी

Leave A Reply

Your email address will not be published.