Latest Marathi News

BREAKING NEWS

ऑस्कर पटकावणारा ‘नाटू-नाटू’ गाण्याचा गायक पोहचला धीरेंद्र बाबाच्या भेटीला.

0

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे नाव देशभर गाजत असल्याचं दिसून येत आहे. धीरेंद्र शास्त्री हे सतत चर्चेत असतात.अशातच 18 मार्च रोजी धीरेंद्र शास्त्री यांचा मुंबईतील मीरा-भाइंदर रोड येथील एस.के. स्टोन मैदानावर भव्य दरबार भरला होता. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या दरबाराला भेट दिली होती.

कुणाच्याही मनातलं ओळखण्याची अनोखी सिद्धी या बाबांना अवगत असल्याची चर्चा आहे. त्यावरुन त्यांना अनेकांनी आव्हान देखील दिले आहे. आणि याच कारणांमुळे धीरेंद्र शास्त्री नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. अश्यातच आता बागेश्वर महाराजांच्या दर्शनाला मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी देखील उपस्थित राहत असल्याचे दिसून आले आहे.

ज्यामध्ये ‘आरआरआर’ चित्रपटातील ऑस्कर मिळालेल्या ‘नाटू नाटू’ गाण्याचे हिंदी गायक ‘विशाल मिश्रा’ आणि प्रसिद्ध अभिनेत्री ‘सिमरन कौर’ यांचा समावेश आहे. सध्या या दोन्ही कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. नेटकरी देखील त्यांच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही महिन्यात चर्चेत आले होते. नागपुरातील अंधविश्वास अनमूलन समितीने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवत आव्हानापासून पळ काढल्याचा आरोप केला आहे. यावर आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी रायपूरमध्ये मोठे वक्तव्य केले आहे. तेव्हा पासून ते सतत चर्चेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.