पुणे , १३ ऑक्टोबर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सध्या भाजपचे घर चलो अभियान सुरु आहे. आज बारामती लोकसभा मदारसंघात हा प्रवास सुरु आहे. बावनकुळे तसेच चंद्रकांत पाटील यांनी आज धायरी येथील नागरिकांशी संवाद साधला.
लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चंद्रकांत पाटील यांचा आज बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रवास सुरू आहे. यावेळी धायरितील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. प्रत्येक धायरीकर उत्स्फूर्तपणे एकच गोष्ट सांगत होता; २०२४ मध्येही फक्त आणि फक्त मोदीजीच पंतप्रधान होणार!
बारामतीतल्या जनतेने यंदा मोदींजींनाच साथ देण्याचं ठरवलंय. कुठलीही आघाडी झाली, तरी २०२४ मध्ये मोदीजीच पंतप्रधान होणार हे निश्चित असल्याचे पाटील यांनी म्हटले.