Latest Marathi News

BREAKING NEWS

मोदी सरकारच्या कालखंडात ईडीने 3 हजार छापे मारले , निशाण्यावर पक्त विरोधी पक्ष

0

नवी दिल्ली | मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या आठ वर्षात ईडीने तब्बल ३ हजार छापे मारले आहेत. ईडीच्या निशाण्यावर केवळ विरोधी पक्ष असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विरोधकांना रोखण्यासाठी ईडी म्हणजे पंतप्रधान मोदी यांचं विरोधांविरोधातलं प्रमुख अस्त्र असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. छत्तीसगड मधल्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडी काँग्रेस नेत्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे मारली केली. यावर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ईडीची छापेमारी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रतिशोध असल्याचं म्हटलं आहे. तर काँग्रेस नेता पवन खेडा यांनी दिलेल्या माहितीनुसार 2004 ते 2014 दरम्यान यूपीए सरकार सत्तेवर असताना 112 वेळी ईडीने कारवाई केली. तर 2014 नंतर म्हणजे गेल्या 8 वर्षात ईडीने तब्बल 3010 वेळा कारवाई केली आहे.गेल्या 8 वर्षात ईडीच्या निशाण्यावर केवळ विरोधक असल्याचा दावा पवन खेडा यांनी केला आहे. 95 टक्के छापे हे केवळ विरोधकांवर टाकण्यात आले आहेत.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची चौकशी करण्यात आली. आत काँग्रेसचं 85 वं अधिवेशन होणार आहे, त्याआधी छत्तीसगढमध्ये छापेमारी सुरु करण्यात आली आहे. आता ईडीचा अर्थ इलीमिनेटिंग डेमोक्रसी (लोकतंत्र संपवणं) असा झाला आहे. केंद्र सरकारने ईडीचा अर्थच बदलून टाकला आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. या आकडेवारीनुसार काँग्रेसवर सर्वाधिक 24 वेळा, टीएमसी -19, राष्ट्रवादी – 11, शिवसेना – 8, डीएमके – 6, आरजेडी – 5, बीएसपी – 5, पीडीपी – 5, आईएनएलडी – 3, वाईएसआरसीपी- 2, सीपीएम- 2, नॅशनल कॉन्फरेन्स – 2, पीडीपी- 2, एआईएडीएमके- 1, एमएनस – 1 आणि एसबीएसला 1 वेळा ईडी कारवाईचा सामना करावा लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.