Latest Marathi News

BREAKING NEWS

“इथून पुढच्या काळात शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही” – केंद्रीय मंत्री नारायण राणे

0

मुंबई |

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांनी नुकताच अर्ज दाखल केलाय. यावेळी दोन्ही गटांच्या रॅलीमध्ये पक्षाचे दिग्गज नेते शक्तिप्रदर्शनासाठी मैदानात उतरले होते. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी “हिंमत असेल तर मैदानात येवून दाखवा” असे आवाहन उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले कि, ठाकरेंकडे आता काही राहिले नाही त्यांच्या हातून महाराष्ट्र, मुंबई गेली आहे. त्यामुळे त्यांनी आपली बडबड बंद करावी. पुढील काळात शिवसेनेचा एकही खासदार मुंबईत निवडून येणार नसल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला. सर्व एकत्र आले म्हणजे शक्ती तयार होते असे नाही असेही ते यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.