Latest Marathi News

BREAKING NEWS

नितेश राणेंकडून ठाकरेंचा तो व्हिडीओ ट्वीट; ‘सर्वात मोठा गद्दार’ म्हणून केले संबोधित

0

‘औरंगजेब माझा भाऊ होता,’ असं वक्तव्य असलेला उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्वीट केला आहे. औरंगजेबाला आपला भाऊ मानणाऱ्या नेत्याला राणेंनी सर्वांत मोठा गद्दार संबोधलं आहे. परंतु, उद्धव ठाकरे ज्या औरंगजेबाला आपला भाऊ म्हणत आहेत तो इतिहासातला औरंगजेब नसून लष्करातील औरंगजेब आहे, असं नेटकऱ्यांनी राणेंना सुनावल असून त्यांचीच पंचायत झाली आहे.

‘औरंगजेब माझा भाऊ होता. त्याने भारतासाठी आपले प्राण गमावले. तो धर्माने मुसलमान असेलही. पण त्याने आपल्या देशासाठी प्राण दिले. मग तो आपला भाऊ नाही झाला का?’, असं उद्धव ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. हा व्हिडीओ आज भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्वीट करून सर्वांत मोठा गद्दार असं कॅप्शन दिलं आहे.परंतु, या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे ज्या औरंगजेबाबाबत बोलत आहेत तो औरंगजेब इतिहासातील नसून भारतीय सीमेचं रक्षण करताना शहीद झालेला जवान औरंगजेब आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर नेटिझन्सने संताप व्यक्त केला आहे.

कोण होते औरंगजेब ?

१४ जून २०१८ मध्ये औरंगजेब नावाचे भारतीय लष्करातील जवान पुलवामाच्या कालम्पोरा येथे शहीद झाले होते. १४ जून रोजी ते राजौरी येथे ईद साजरी करण्याकरता आपल्या गावी जात होते. तेव्हा काही दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं. सायंकाळी पोलिसांना कालम्पोरापासून १० किमी अंतरावर असलेल्या गुस्सू गावात त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. ३० एप्रिल २०१८ रोजी मेजर रोहित शुक्ला यांच्या समूहातून औरंगजेब यांनी एक मोठं दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन यशस्वी पार पाडलं होतं. यामुळेच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली असल्याचं म्हटलं गेलं.

Leave A Reply

Your email address will not be published.