Latest Marathi News

BREAKING NEWS

सत्तेची मस्ती बघा, माजी खासदार निलेश राणेंचा सेनेवर घणाघात

0

मुंबई : सिनेअभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना पक्षात सुरु असलेल्या शीतयुद्धाच्या कांदिवली येथे एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसेना शाखाप्रमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीवरून आता भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

“सत्तेची मस्ती बघा, आयुष्भर कोण सत्तेत राहत नाही… सत्ता जेव्हा बदलेल तेव्हा लपायला जागा मिळणार नाही लक्षात ठेवा. जिथे दिसाल तिथे फटके खाल तो दिवस लांब नाही” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. या मारहाणी प्रकरणी कांदिवली पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून शाखा प्रमुख कमलेश कदम यांना अटक करण्यात आली आहे.

कांदिवली समता नगर येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारझोड केल्याचा आरोप शर्मा यांच्या कन्या डॉ शीला शर्मा यांनी केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.