Latest Marathi News

BREAKING NEWS

“न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातमीचं हेडिंग, मोदींच्या लोकशाहीत भारताची हत्या” 

0
-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेच्या अधिवेशनात न्यूयॉर्क टाइम्सची बातमी दाखवली. या बातमीमुळे देशातील प्रत्येकाची छाती अभिमानाने फुगली आहे. कोणालाही विचारा शिक्षण मंत्री कोण तर ते एकाच व्यक्तीचे नाव घेतील. मात्र केंद्र सरकारमधील, उत्तर प्रदेशमधील किंवा राजस्थानमधील शिक्षण मंत्री कोण कोणाला सांगता येणार नाही.
जणूकाही देशात एकच शिक्षण मंत्री आहेत. न्यूयॉर्क टाइम्समध्ये ही बातमी 18 ऑगस्टला छापली होती. त्याच्या एका आठवड्यानंतर 25 ऑगस्टला त्यांनी आणखी एक बातमी छापली. ‘मोदींच्या लोकशाहीत भारताची हत्या’ असे त्या बातमीचे शिर्षक होते व ही सर्व भारतीयांसाठी लाजीरवाणी गोष्ट असल्याची टीका केजरीवाल यांनी केली.
ते म्हणाले की अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नी दिल्लीतील सरकारी शाळा पाहण्यासाठी आल्या. बान की मून यांच्या पत्नी दिल्लीतील मोहल्ला क्‍लिनिक पाहण्यासाठी आल्या. सिंगापूरच्या कार्यक्रमाचे मला आमंत्रण देण्यात आले होते.तेथे गेलो असतो संपूर्ण जगातील महापौरांना त्याची माहिती देता आली असती. देशासाठी ती अभिमानाची गोष्ट ठरली असती. मात्र राष्ट्रविरोधी शक्ती एकत्र आल्या आणि यांना रोखा असे त्यांनी ठरवले. दिल्ली सरकार पाडण्याचे त्यांनी कारस्थान रचले. मनीष सिसोदिया यांच्या विरोधात खटला दाखल केला.
Leave A Reply

Your email address will not be published.