काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले अशी टीका शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लगावला होता तसेच आता खदखद बाहेर आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या भूमिकावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. मविआमध्ये कुठलाही वाद नाही.
नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झालं आहे. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पटोलेंनी राजीनामा देतांना सगळ्यांना विश्वासात घेतलं नाही एवढीचं व्यथा आहे, पण आता तो विषय संपला आहे, असं शरद पवार म्हणाले. भाजपाने त्यांच्या पक्षात काय करावे त्यांचा प्रश्न, अनिल देशमुख १ वर्षे जेलमध्ये होते. संजय राऊत देखील जेलमध्ये होते. नवाब मलिक आजही जेलमध्ये आहे. राज्य पातळीवर काम करणाऱ्या या नेत्यांना पाहता त्यांच्या भूमिकेचा विचार त्यांनी करावा, असंही पवार म्हणाले.
अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्याबळ नाही, संख्याबळ असते तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असं पवार पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले.
मुंबई मनपाची निवडणूक पाहुन मोदी महाराष्ट्रात येत आहे हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काही हरकत नाही, पण ते येवून राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा, असा टोलाही पवारांनी मोदींना लगावला.