Latest Marathi News

BREAKING NEWS

नाना पटोलेंच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं एका वाक्यात उत्तर म्हणाले की,

0

 

राज्यातील सत्तांतरापासून राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप हे वाढलेले आहेत. सत्तेसाठी भाजपाकडून कायपण केले जाऊ शकते हे विरोधकांकडून पटवून दिले जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहामुळेच ही स्थिती ओढावल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 105 आमदार असताना सत्तेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न सबंध राज्याने पाहिले आहेत.

तसेच भाजपाचा रावणासारखा अहंकार समोर येत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. मात्र, भाजप पक्ष नसून एक कुटुंब आहे. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विशेष अशी काळजी घेतली जाते. त्यामुळेच आजारी असलेल्या मतदरांना देखील आणण्याची सोय पक्षाच्या माध्यमातून केला जात असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितले आहे.

भाजपमध्ये प्रत्येकाला आपण एका कुटुंबात असल्याची भावना आहे. कुटुंबप्रमुख म्हणून पक्षाच्या माध्यमातून प्रत्येकाचीच काळजी घेतली. त्यामुळेच मतदार असलेल्यांना विशेष सोय करुन मतदानासाठी आणले जात आहे. ही भाजपाची संस्कृती. पण कॉंग्रेस ना पदाधिकाऱ्यांची चिंता आणि कार्यकर्त्यांची. त्यामुळे पक्षात फूट पडत आहे. कुटुंबाप्रमाणे सर्वांना वागणून देण्याची त्यांची संस्कृती नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी कॉंग्रसेवर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.