Latest Marathi News

BREAKING NEWS

नागपूरच्या पराभवानंतर खडसेंचे फडणवीसांना थेट चॅलेंज

0

५ विधानपरिषद मतदारसंघांपैकी भाजपला केवळ कोकणातील एक जागा जिंकता आली. भारतीय जनता पक्षाच्या या पराभवाची संपूर्ण राज्यभरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातही, भाजप नेते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड असलेल्या नागपुरातही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. याच मुद्द्यावरून विरोधकांकडूनही टीका होत आहे.

मात्र, कालचा पराभव हा एकमेव नसून निवडणुकांमध्ये भाजपला नागपुरात मिळालेला हा सलग तिसरा पराभव आहे. आताा, या पराभवावरुन विरोधक भाजपवर शरसंधान साधत आहेत. पूर्वश्रमीचे भाजप नेते आणि सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनीही या पराभवावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

नोकरदार शिक्षक वर्ग म्हणतो पूर्वीचे पेन्शन पाहिजे. त्यावेळी, आपले फडणवीस साहेब म्हणत होते, विरोधी पक्षात दम नाही. आम्ही पेन्शन देऊ असं देवेंद्रजींनी निवडणुकीत सांगितलं. पण, जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणूनच, नागपूरची जागा मुद्दामून मतदारांनी पाडली, असे म्हणत खडसेंनी नागपूरच्या पराभवाला फडणवीसांना जबाबदार धरलं. तसेच, फडणवीस, गडकरी यांच्या बालेकिल्ल्यात विशेषत: संघाच्या बलिष्ठानातील निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ल्याचेही ते म्हणाले.

खडसेंच्या गावात खडसे सरपंच निवडून आणू शकत नाही, असं मला म्हणणाऱ्या फडणवीस यांना माझा सवाल आहे. आता, नागपूरचा आमदार तरी निवडून आणून दाखवा, असे चॅलेंजच एकनाथ खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.