विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र हे अधिवेशन विविध मुद्द्यांवर तापलेले दिसून येत आहे अशातच आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते नागपुरात आहेत. अशात महाराष्ट्र ननिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते नागपुरात असतील. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाढीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौरा करणार आहेत. उद्या ते नागपुरात दाखल होती. त्यानंतर ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतील. पक्षाच्या वाढीसाठी, विस्तारासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा करतील. स्थानिक प्रश्न काय आहेत? ते सोडवण्यासाठी काय उपाय करता येतील, याबाबतही ते मनसौनिकांशी चर्चा करतील. तसंच नव्या शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्र देतील.
सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते नागपुरात आहेत. अशात राज ठाकरेंचा नागपूर दौरा चर्चेचा विषय आहे. तसेच या दौऱ्यादरम्यान ते शिंदे आणि फडणवीस यांची भेट घेणार का?हे सुद्धा पाहावे लागणार आहे.