Latest Marathi News

BREAKING NEWS

द न्यूज प्लस चॅनेलच्या नूतन कार्यालयाचे उद्‌घाटनजिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणामुळे द न्यूज प्लस चैनल प्रगतीपथावर नागेश छाब्रिया

0

सोलापूर,दि:-कष्ट चिकाटी आणि प्रामाणिक पणामुळे द न्यूज प्लस चैनल प्रगतीपथावर जात आहे. अशी प्रशंसा मेट्रो कास्ट नेटवर्क चे सर्वेसर्वा श्री नागेश छाब्रिया यांनी केले . मेट्रो कास्ट नेटवर्क अंतर्गत असलेल्या द न्यूज प्लस चॅनेलच्या नूतन कार्यालयाचे उद्‌घाटन मेट्रो कास्ट नेटवर्कचे सर्व्हेसर्वा नागेश छाब्रिया यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी छाब्रिया बोलत होते.
याप्रसंगी मेट्रो का नेटवर्कचे प्रमुख सुमुख छाब्रिया तसेच मेट्रो कास्ट नेटवर्कचे संचालक रविंद्र पाटील, जनरल मॅनेजर संतोष परबतराव, चॅनेलचे संचालक तात्यासाहेब पवार, उमाकांत चौंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छाब्रिया यांनी अल्पावधीतच लोकप्रिय होत असलेल्या चॅनलच्या कार्याचे तसेच कर्मचाऱ्यांचे कौतुक करून चॅनेलच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सातरस्ता येथील द मिलेनियन स्क्वेअर येथील इमारतीत हा कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी द न्यूज प्लस चैनल चे वृत्तसंपादक जयपाल खेडकर, जाहिराती विभागाचे प्रमुख सलीम पटेल, एडिटिंग वसीम शेख, उपसंपादक बालाजी चीटमिल, सहाय्यक मॅनेजर बसवराज बिराजदार, टेक्निकल विभागाचे प्रमुख संतोष चोरमुले, नबीलाल पटेल, उद्धव नगशेट्टी, नागेश खरटमल, रवि साखरे, नितीन भोसले, सुनिल वाघमारे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक संजय कुलकर्णी तर शेवटी आभार संचालक तात्यासाहेब यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.