Latest Marathi News

BREAKING NEWS

मुंबईत धुवाधार पाऊस; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

0

 

राज्यात पुन्हा एकदा अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. शहर आणि परिसरात सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून समुद्रालाही मोठी भरती आली आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी सबवे येथे 2.0 फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद आहे. पावसामुळे मुंबईतील मरीन ड्राईव्हला मोठी भरती आली आहे. हवं खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अंधेरी सबवेमध्ये दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. राज्यातील पावसाची स्थिती – राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील 3-4 दिवसांपासून प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. अशात आता आजही अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.