Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री कार्यालय जागृत असायलाच पाहिजे; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

0

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटला असताना बुधवारी दिल्लीतील संसद भवनात याबाबत एक महत्त्वाची बैठक झाली. . या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी बसवराज बोम्मई यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. महत्त्वाचे म्हणजे या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (\हेदेखील उपस्थित होते.

या बैठकीमध्ये ज्या ट्विटर अकाउंटवरून माझ्या नावाने ट्विट करण्यात आले, ते ट्विटर अकाउंट माझे नव्हते, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. यासोबतच याबाबत तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही बोम्मईंनी दिले. आता त्यांच्या या बैठकीवरून अनेक प्रतिक्रिया येत असताना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीसुद्धा बोम्मई यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, गेले १५ ते २० दिवस हाच प्रश्न चिघळला जात आहे. मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हॅक झाले, त्याचा शोध होईलच; परंतु खुलासा होण्यास एवढे दिवस का लागले? पोलीस कारवाई झाली ती प्रत्यक्ष झाली होती. महाराष्ट्रातील वाहनांना बंदी प्रत्यक्ष झाली होती. जर ट्विटर हॅक झाले होते, तर मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि जागृत असायलाच पाहिजे, की आपल्या ट्विटरवरून कोण काय बोलते. तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता,
.
तसेच, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना दोन्ही राज्यांनी काही करू नये, हा काही नवीन सल्ला नाही. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असताना बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला की यापूर्वी दिला? विधानसभेचे अधिवेशन आधीपासून सुरू आहे की नंतर सुरू झाले? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत केवळ महाराष्ट्रानेच का थांबायचे? या सर्व गोष्टींचा ऊहापोह नुसते पोहे खाऊन होणार असेल तर काही अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.