Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोडला पंतप्रधान मोदींचाही रेकॉर्ड

0

 

काळ शिवतीर्थावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि BKC मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेळावा पार पडला अशातच शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा अखेर पार पडला आहे. पण, कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होणार यावरून दोन्ही गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू होती. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दी जमवण्यात बाजी मारली आहे.

बीकेसी मैदानावर 1 लाख 25 हजार लोक आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 65 हजार शिवसैनिक आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचाही रेकॉर्ड मोडीत काढला. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिंदे गटाने आपला वेगळा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर भरवला होता. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बोलावण्यात आले होते.

एमएमआरडीएच्या बीकेसी मैदानाची जागा मोठी आहे. त्यामुळे या मैदानावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संख्या जास्त असणार अशी शक्यता होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या मेळाव्याला अंदाजे 1 लाख 25 हजार कार्यकर्ते (5 ते 7 हजार कमी किंवा जास्त)जमा झाले होते अशी माहिती समोर आली होती. याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा पार पडली होती. पण, त्यांच्या सभेला जवळपास 97 हजार कार्यकर्ते (5 ते 7 हजार कमी किंवा जास्त) उपस्थितीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.