Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे या कार्यक्रमानिमित्त येणार एकत्र !

0

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत नव्या गट स्थापन केला. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंपामुळे एकच खळबळ माजली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेंनी राज्याची सूत्र आपल्या हातात घेतली. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना मिळेल तेव्हा टीका करायला लागले. पण आता या भूकंपानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र येणार आहेत.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकदाही कोणत्या व्यासपीठावर एकत्र आलेले नाहीत. मात्र, आता नव्या वर्षात हे आजी-माजी मुख्यमंत्री मुंबईतील एका कार्यक्रमाता एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी हे निमित्त समोर आलं आहे. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं…या तैलचित्राचं 23 जानेवारीला अनावरण होणार आहे…त्यानिमित्ताने शिंदे, फडणवीस, ठाकरे एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. यावेळी शिंदे आणि ठाकरे संवाद साधणार का…? याकडेच अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असेल

Leave A Reply

Your email address will not be published.