खमक्या इंडिया : बार्शी,
सामाजिक कार्यात अग्रेसर तसेच उद्योग व बँकिंग क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मुरलीधर चव्हाण होय. शिवशक्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक, मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक सहसचिव, भाग्यकांता ग्रुपचे सर्वेसर्वा मुरलीधर चव्हाण यांची सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी अविरोध निवड झाली आहे.
मुरलीधर चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल मातृभूमी प्रमुख संतोष ठोंबरे, शिवशक्ती बॅंक अध्यक्ष तथा अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश बुरगुटे, ज्येष्ठ संपादक तथा डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राजा जी माने, खमक्या इंडियाचे संपादक तथा आर्किटेक्ट अमित इंगोले पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष दिलीप पतंगे यांच्यासह बार्शी शहर आणि तालुक्यातील विविध क्षेत्रामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.