काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या टिपण्णीमुळे कोर्टाकडून त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर त्यांनी खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या रद्द केलेल्या खासदारकीवरून देशभरात काँग्रेस नेते आक्रमक झाले आहे तर ठिकठिकांणी भाजपा विरोधात काँग्रेसने आंदोलन छेडले आहे.
अशातच आता छ्त्रपती संभाजी नगरात पोस्टरबाजी करत राहुल गांधी यांचावर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिउत्तर देण्यात आले आहे. ‘मोदी चोर है’ अशा आशयाचे पोस्टर शहरभरात लावले आहेत. विशेष म्हणजे शहरातील सर्वच महत्वाच्या ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहेत.
राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या विरोधातील पोस्टर वेगवेगळ्या ठिकठिकाणी लावले आहेत. या पोस्टरवर, “चौकीदार चोर हि नही, डरपोक भी है…हुकुमशाही पद्धतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द करणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध…निरव ललित मोदी चोर है (बोल्ड अक्षरात) असे लिहण्यात आले आहे. तर डॉ. निलेश आंबेवाडीकर, विजय कांबळे, आकाश रगडे, मयूर साठे आणि अभिषेक शिंदे यांचे नाव निषेधकर्ते म्हणून या पोस्टरवर उल्लेख करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज ‘मोदी चोर है’ असे आशयाचे पोस्टर शहरात लावले आहेत. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बस स्थानकावर उभ्या असलेल्या एसटी बसवर हे पोस्टर लावले आहेत. तर शहारतील वेगवेगळ्या पाट्यावर देखील हे पोस्टर लावण्यात आला आहे. सोबतच एसबीआय बँकेच्या काचेवर देखील असे पोस्टर लावले आहेत. तसेच यावेळी ‘राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है…नही चलेंगी नही चलेंगी दादागिरी नही चलेंगी.. अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे या हटके पोस्टरची शहरभरात चर्चा पाहायला मिळत आहे.