Latest Marathi News

BREAKING NEWS

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली अतिवृष्टी बाधित भागाची पाहणी

0

माढा |

करमाळा-माढा मतदार संघातील कंदर, वडशिवणे, केम, ढवळस, चौभेपिंपरी, रोपळे, कव्हे, कुर्डुवाडी या गावांत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रांची पाहाणी केली.या भागात सुमारे ५००० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पाहणी विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली.

ऊस, केळी, उडीद, तुर, मका,कांदा आणि भाजीपाल्याची पिके वाहुन गेली आहेत,काही ठिकाणी पाझर तलाव फुटल्यामुळे तलावाखालच्या विहीरी,कुपनलिका बुजुन गेल्या आहेत, विजपंप व इतर साहित्य वाहुन गेले आहे. कुर्डुवाडी शहरात लोकवस्तीमधे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पाण्याखाली जावुन अनेक जिवनावश्यक वस्तुचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात त्या त्या ठिकाणच्या संबंधित अधिकार्यांना सुचना करुन कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना करुन अतिवृष्टी बाधितांना न्याय देण्यासंदर्भात सुचित केले.

यावेळी करमाळा-माढाचे माजी नारायण पाटील, मा.जि.प अध्यक्ष अनिरुध कांबळे, मा.जि.प सभापती शिवाजीनाना कांबळे, मा.जि.प.सदस्या सवीताराजे भोसले,भारतनाना पाटील,अजित तळेकर,व इतर नेतेमंडळी उपस्थित होती.

Leave A Reply

Your email address will not be published.