Latest Marathi News

BREAKING NEWS

“मंत्री धनंजय मुंडेंनाही जीवे मारण्याची धमकी…!”

0

मुंबई |

मंत्री छगन भुजबळांपाठोपाठ शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील आणखी एका मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

धनंजय मुंडे यांच्या परळीतील घरी धमकीचा फोन आला होता. मला ५० हजार रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारिन अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.