Latest Marathi News

BREAKING NEWS

चित्रपट, क्रिकेट आणि नेतृत्व यांचा संगम असलेल्या खासदार सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगच्या दिमाखदार जर्सीचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अनावरण संपन्न

0

पुणे : पुण्यातील कलाकारांची एकमेकांशी ओळख व्हावी, यासाठी जुलै महिन्यात खासदार सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांच्या जर्सीचे अनावरण रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

चित्रपट, क्रिकेट आणि नेतृत्व यांचा अफलातून संगम अनुभवण्याची तयारी सुरू झाली आहे, यंदाच्या जुलै महिन्यात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा उत्साह, मैत्री आणि खिलाडूवृत्ती अनुभवण्यासाठी खासदार सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी या लीगच्या जर्सीचे अनावरण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषात पार पडले. ही क्रिकेट स्पर्धा मराठी सृष्टीतील कलावंत, लोकप्रतिनिधी आणि खेळाडू यांच्यातील संवाद, बंध आणि एकात्मतेचा साक्षात्कार करणारा महोत्सव आहे. लवकरच ह्या स्पर्धेतील रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे, अभिनेते तथा मित्रवर्य प्रवीण तरडे, प्रथमेश परब, संजय नार्वेकर, हार्दिक जोशी, रमेश परदेशी, संगिता तिवारी यांच्यासह अनेक नामवंत व नवोदित कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.