Latest Marathi News

BREAKING NEWS

मेट्रो कारशेड समितीचा अहवाल का दडपला? सोमय्यांचा तत्कालीन आघाडी सरकारला सवाल

0

मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. तुम्ही स्वतः नेमलेल्या आरेतील मुंबई मेट्रो कारशेडचा अहवाल का दडपला? असा थेट प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली आरे कारशेडचा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश दिला. त्यानंतर नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल का दडपला?

किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शपथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २९ नोव्हेंबरला मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांनी आपला अहवाल २ आठवड्यात व नंतर मुदत वाढून ३ महिन्यात देण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मनोज सौनिक समितीची रचना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. समितीचे सदस्य तत्कालीन मुख्यमंत्री यांनी स्वत: निवडले होते. समितीने १५ दिवसात व नंतर लांबून ३ महिन्यात अहवाल देण्याचे आदेश तेव्हा उद्धव ठाकरे यांनी दिले होते. समितीने आपला अहवाल पण दिला होता. त्यानंतर या समितीचा अहवाल दाबण्याचे खरे कारण काय? असा प्रश्न सोमय्या यांनी विचारला.

सोमय्यांनी मनोज सौनिक समितीच्या अहवालातील काही माहिती दिली. त्यात सोमय्यांनी सांगिलं की, आरे कारशेड व इतर १० जागांचा अभ्यास समितीने केला असून त्याच्या अहवालात म्हटलं की, अशा प्रकारे कोणतेही प्रकल्प थांबवणे, आरे कारशेडच्या कामाला रद्द करणे हे योग्य नाही. तसचं हे कायदेशीर आणि व्यवहार्य नाही. समिती राज्य सरकारला सूचित करू इच्छितो की, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. (MMRCL) ला आरे कारशेडचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावे, हे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. आरे कारशेड येथेच मेट्रो लाईन ३ चा डेपो व्हायला हवा, आरे कारशेड व मेट्रो ३ चे काम गतीने पूर्ण व्हावे अशी सूचनाही मनोज सौनिक समितीने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.