मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि शिवसेना-भाजप युतीचे अन्य नेते स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या समर्थनार्थ ‘गौरव यात्रे’पूर्वी त्यांनी त्यांचे सोशल मीडियावर प्रोफाइल फोटो बदलेले दिसले.नेत्यांनी ‘मी सावरकर’ किंवा ‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिले. भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सावरकरांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर आली आहे.
आणि शिवसेना-भाजप युतीचे अन्य नेते स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या समर्थनार्थ ‘गौरव यात्रे’पूर्वी त्यांनी त्यांचे सोशल मीडियावर प्रोफाइल फोटो बदलेले दिसले.नेत्यांनी ‘मी सावरकर’ किंवा ‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिले. भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सावरकरांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर आली आहे.
तसेच काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी 30 मार्चपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहि. सोशल मीडियावर सावरकरांचे छायाचित्र टाकण्यासोबतच नेत्यांनी ‘मी सावरकर’ किंवा ‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिले.सावरकर यांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदे यांनी सोमवारी संध्याकाळी त्यांचा ट्विटरचा डीपी बदलून सावरकर यांचे फोटो लावले.
तसेच मंगळवारी (28 मार्च ) पत्रकार परिषद घेऊन सावरकरांसारख्या वीरांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेतून राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले,’राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्याचा मी निषेध करतो. सावरकरांच्या स्मरणार्थ आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सावरकरांच्या कार्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.’