Latest Marathi News

BREAKING NEWS

मी कुणाच्या धमक्यांना भीत नाही’, धमकी मिळाल्यानंतर सलमान खानची प्रतिक्रिया

0

सलमान खानला नुकतीच ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याच्या घराबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. मात्र सलमानच्या जवळच्या काही माणसांना सांगितलं की, सलमानला कोणत्याही धमकीमुळे काही फरक पडत नाही. त्याला मुक्तपणे जीवन जगायला आवडतं. तसेच तो कोणालाही घाबरत नाही.

सलमानच्या जवळच्या माणसाने सांगितलं की, सलमानने या धमकीला खूप नॉर्मल पद्धतीने घेतलं आहे. किंवा त्याचे पालक टेन्शनमध्ये यायला नको म्हणून तो तसं दाखवतंही असेल. एकत्र राहणाऱ्या सलमानच्या कुटुंबाबद्दल ही गोष्ट खास आहे की, कुणीही त्यांच्या चेहऱ्यावर घाबरल्याचं दाखवतं नाहीत. सलमानचे वडील सलीम खानसुद्धा खूप शांत आहेत. मात्र संपूर्ण कुटुंबाला माहिती आहे की, ते रात्री काळजीने झोपत नाहीयेत.

सलमानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकरला एक धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. ज्यात सलमानसोबत बोलणी करण्याची मागणी करण्यात आली. रोहित गर्ग नावाने हा ईमेल करण्यात आला आहे. ईमेलमध्ये लिहिलं आहे की, गोल्डीला तुझा बॉस सलमान खानसोबत बोलायचं आहे. त्याने मुलाखत बघितलीच असेल.

पुढे बोलताना म्हणाला की, नसेल बघितली तर त्याला बघायला सांग. मॅटर क्लोज करायचा असेल तर बोलणी होऊ देत. समोरासमोर बोलायचं असेल तर तसही सांग. अजुन वेळ आहे म्हणून कळवलं आहे. पुढच्या वेळी मोठा झटका मिळेल. ई मेल मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार करण्यात आली. त्यानंतर सलमानच्या घराजवळ म्हणजे गॅलॅक्सीजवळ पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.