शिंदे फडणवीस सरकार म्हणजे काळू बाळूचा तमाशा असून शहाजीबापू यातील सोंगाड्या आहेत अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका जाहीर सभेत केली होती. तर दुसरीकडे यावर शहाजीबापू पाटील यांनी आव्हान देत मी सोंगाड्या तर विनायक राऊत ठाकरे सरकारमध्ये नाच्या होते का? राऊत याना कोकणात येऊन उत्तर देणार असं म्हटलं आहे.
सध्या राज्यात सुरु असलेले सरकार म्हणजे काळू बाळूचा तमाशा असून यात एक दाढीवाला तर दुसरा बिन दाढीवाला आहे, तर शहाजीबापू पाटील हा या तमाशातील सोंगाड्या आहे अशी सणसणीत टीका शिवसेनेचे नेते खा विनायक राऊत यांनी केली. शिवसेना आणि ठाकरे यांचेवर तुफानी फटकेबाजी करणारे सांगोल्याचे ‘काय झाडी काय हॉटेल’ फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात काल शिवसेनेने सभा घेतली. मात्र ही सभा मोकळ्या मैदानावर न घेता एका बंद सभागृहात पार पडली.
या सभेत शहाजीबापू यांनीही खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना आपण जर या सरकार मधील सोंगाड्या आहे, तर तुम्ही काय ठाकरे सरकार मध्ये नाच्या होता का असा सवाल केला. पावसाळा संपला कि मी विनायक राऊत यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार असून राऊत यांनी ती ऐकायला आधीच कानातला मळ काढून ठेवावा. या सभेत विनायक राऊत यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असे आव्हान आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले आहे.