Latest Marathi News

BREAKING NEWS

‘मी नाराज नाही, पक्षाच्या निर्णयाला माझा पाठिंबा’, संजय राऊतांकडून स्पष्टीकरण

0

 

मुंबई | सोमवारी मातोश्रीवर शिवसेना खासदारांची एक वादळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना समर्थन देण्याची मागणी शिवसेना खासदारांकडून करण्यात आली. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी विचार करून निर्णय घ्यावा असेही खासदारांनी याच बैठकीत पक्षप्रमुखांना सांगितलं.

या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. संजय राऊत यांचा खासदारांच्या भूमिकेला विरोध असल्याचेही चर्चा बाहेर आल्या होत्या. मात्र पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य असेल, मी नाराज नाही म्हणत संजय राऊत यांनी आपली भूमिका ही स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता शिवसेना ही द्रौपदी मुर्मु यांनाच निवडणुकीत पाठिंबा देणार का? असा सावल उपस्थित झाला आहे.

तर बैठकीत सर्व विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रपती निवडणुकींबाबतही चर्चा झाली. शिवसेनेने राजकारणाच्या पलिकडे जाऊन राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला आहे. सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना दिला आहे. त्यांचा आदेश बंधनकारत आहे. त्यामुळे मी नाराज नाही, जो पक्षाचा निर्णय असेल. त्याला माझा पाठिंबा असेल. अशा बातम्या कुणीही चालवू नको. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या मागे सर्व खासदार उपस्थित राहतील, अशी प्रतिक्रिया नाराजीच्या वृत्तावर संजय राऊत यांनी दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.