Latest Marathi News

BREAKING NEWS

मावळ लोकसभेसाठी सुनील शेळकेंचे खासदार श्रीरंग बारणेंना आव्हान

0

राज्यत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाल्यानंतर शिंदे गटाचे खासदार अस्लेल्यामतदार संघात उद्धव ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्र्वादीने सुद्धा आपला हक्क त्या मतदार संघावर सांगितलं आहे अशातच आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रणशिंग पुकारले आहे. त्यासाठी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे यांना ‘लक्ष्य’ करण्यात येत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मावळचे आमदार सुनील शेळके यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली होती. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीने आतापासून ‘फिल्डिंग’ लावली आहे.विशेष म्हणजे, आमदार सुनील शेळके यांची लोकसभा लढवण्याची महत्त्वाकांक्षा आणि क्रेझ आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या ऐवजी शेळके यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर परिणामी, सुनील शेळके यांनी चिंचवड मतदार संघातील पोटनिवडणुकीत मिळालेल्या संधीचे सोने करीत विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना लक्ष्य केले आहे. मावळ मतदार संघात बारणे यांनी काय काम केले? त्यांना आगामी निवडणुकीत लोक स्वीकारणार नाही, अशी जहरी टीका शेळके यांनी चिंचवड दौऱ्यावर असताना केली. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शेळके विरुद्ध बारणे असा नवा संघर्ष पहायला मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.