Latest Marathi News

BREAKING NEWS

मणिपूर कथित व्हिडिओवर आता बॉलीवूडच्या अनेक कलारांनी व्यक्त केला रोष

0

मणिपूर गेल्या दोन महिन्यांपासून अशांत असून हिंसाचाराच्या घटना सुरूच असताना माणुसकीला काळिमा फासणारा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर सध्या मणिपूर राज्यात तणाव वाढला आहे. या व्हिडिओमध्ये एका जमावानं दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून त्यांना फिरवलं. त्यांचा भर रस्त्यात विनयभंगही करण्यात आला.

सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून त्या घटनेवर सर्वच स्तरातून संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत. अशातच काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूरमध्ये त्या जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली असून रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतामध्ये त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून या घटनेवर काही बॉलिवूड अभिनेत्रींनी यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे.

या व्हिडिओवर रेणुका शहाणे, उर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा, अक्षय कुमार यांनी ट्वीट करून संताप व्यक्त करत दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केलीय. बॉलिवूड अभिनेत्री रेणूका शहाणे ट्वीट करत म्हणाली, “मणिपूरमधील अत्याचार रोखणारे कोणी नाही का? दोन महिलांचा तो व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडाला नसेल, तर स्वत:ला माणूस म्हणणं योग्य आहे का? भारतीय म्हणणं तर सोडून द्या!”

तर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला, उर्मिला मातोंडकर म्हणतात, “मणिपूरमधला तो थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून धक्का बसलाय. मी घाबरलेय, हादरलेय, भयभयीत झालेय. हे प्रकरण मे महिन्यातील आहे, अद्याप आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. सत्तेच्या नशेत बसलेले आणि अशा घटनांवरही गप्प बसणारे सेलिब्रिटींना पाहून लाज वाटते. प्रिय भारतीयांनो आम्ही इथे कधी पोहोचलो?” असे ट्विट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.