Latest Marathi News

BREAKING NEWS

भविष्यातील योग्य करिअर निवडीसाठी विचारपूर्वक निर्णय घ्या – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे : भाजपा कोथरूड दक्षिण मंडल सरचिटणीस दीपक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात सहभागी होत दीपक पवार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत त्यांचे अभीष्टचिंतन केले. तसेच दहावी-बारावीमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत, भविष्यातील योग्य करिअर निवडीसाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला.

यावेळी भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, दक्षिण मंडल माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.