भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीत यापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर पडळकरांनी निशाणा साधला होता अशातच दोन दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी इंदापूर येथे शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती
या टिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. तर पडळकर यांच्या निषेधार्थ आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी थेट पडळकरांना महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशारा दिला होता
आता याचदरम्यान आता पुण्यात एका पोस्टरची जोरदार चर्चा रंगली आहे. या पोस्टरमधून पडळकरांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात ते पोस्टर कोणाचं अशी चर्चा होताना दिसत आहे. पुण्यातील एका सैनिकाच्या मुलग्याने पोस्टरबाजीतून पडळकरांचा निषेध व्यक्त करत आम्ही तुम्हाला कधीही माफ करून शकणार नाही असा इशारा दिला आहे.
माजी सैनिक स्वर्गीय सूर्यकांत लालाजी पवार यांच्या मुलाने ते पोस्टर लावले आहेत. तर देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही तुम्हाला माफ करू शकणार नाही असा इशारा सूर्यकांत लालाजी पवार यांच्या मुलाकडून देण्यात आला आहे