Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर देवेंद्र फडणवीसांना नवी उपाधी, नागपुरात झळकले बॅनर्स

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण होताच रविवारी राजकीय भूकंप झाल्याचे दिसून आले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व राजकीय घडामोडी सुरु असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची वेगळीच चर्चा सुरु असून त्यांना नवी राजकीय उपाधी देण्यात आली आहे.

फडणवीसांचे होमपीच असलेल्या नागपुरात देवेंद्र फडणवीस यांना वेगळी राजकीय उपाधी दिलेलं बॅनर लावण्यात आलं आहे. ‘महाराष्ट्राचा महाचाणक्य’ म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्ज नागपूरमध्ये लावण्यात आले आहेत. कालच्या राजकीय भुकंपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही नवी राजकीय उपाधी देण्यात आली आहे. या बँनरची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी हे बॅनर लावले आहे. यावर ‘महाराष्ट्राचा महाचाणक्य’ असा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करण्यात आला आहे. फडणवीसांच्या शेजारी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. होर्डिंग्जवर कमळ, घड्याळ आणि धणुष्यबाण अशा तिन्ही पक्षांचे चिन्ह एकत्र लावण्यात आलेत.

Leave A Reply

Your email address will not be published.