काश्मिरच्या सीमेवर स्थापित झालेला महाराजांचा पुतळा देशाचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना, काश्मीरमधील नव्या पिढीला प्रेरणा आणि उर्जा देत राहील – चंद्रकांत पाटील
मुंबई, ०७ नोव्हेंबर : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सरकारचे अभिनंदन केले आहे.
काश्मिरच्या सीमेवर स्थापित झालेला महाराजांचा पुतळा देशाचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना, काश्मीरमधील नव्या पिढीला प्रेरणा आणि उर्जा देत राहील असा ठाम विश्वास वाटतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास जम्मू – काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. पुण्याच्या आम्ही पुणेकर संस्था आणि ४१ राष्ट्रीय रायफल मार्फत हा पुतळा स्थापित करण्यात आला आहे.