Latest Marathi News

BREAKING NEWS

मोडनिंबच्या श्री वेताळ देवस्थान यात्रेत महाप्रसाद सेवा सुरू

0

मोडनिंब (ता.माढा) येथील ग्रामदैवत श्री वेताळ देवस्थान यात्रा उत्साहात सुरू आहे. श्री वेताळ देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेनिमित्त दररोज सर्व भाविकांसाठी राजवाडा हॉलमध्ये महाप्रसाद सुरू आहे. राजवाडा परिसरात असणाऱ्या भक्तनिवासात सोमवारी उपस्थितांच्या हस्ते वेताळ देवस्थान प्रतिमा पूजन करून तसेच नैवेद्य दाखवून महाप्रसाद सुरू करण्यात आला.यात्रा कालावधीमध्ये आलेले खेळणी, पाळणे, बाबा गाडी, व्यवसायिक यांचेकडून जागेचे भाडे, लाईटचे भाडे, तसेच वर्गणी घेतली जात नाही. त्यांच्या भोजनाची व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे. यात्रेमध्ये सहभागी झालेले गावातील कलाकार यांनाही जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी श्री वेताळ देवस्थान ट्रस्टचे सचिव विजय खेलबुडे यांनी दिली. ग्रामस्थ रामचंद्र मुसळे आणि निर्मला रामचंद्र मुसळे यांच्या वतीने पहिल्या दिवशी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली.श्री वेताळ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संभाजी लादे, पत्रकार विजय खेलबुडे, नागनाथ माने, राहुल पाटील, मोडनिंब प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रथमेश पवार, गणेश माळी, अमेय पवार, सिद्धांत गांधी, प्रकाश सुरवसे, मारुती वाघ, रमेश शिरसट, विराण कुलकर्णी, युवराज रणसिंग, सौरभ शिंदे, विजय परबत, अजित खडके, बाळासाहेब ओहोळ, हनुमंत यादव यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा प्रारंभ करण्यात आला.सलग चार दिवस यात्रा कालावधीमध्ये महाप्रसादाची सुविधा सुरू केल्याने समाधान व्यक्त होत आहे.यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री वेताळ देवस्थान ट्रस्ट, श्री वेताळ देवस्थान भक्त परिवार सर्व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.