Latest Marathi News

BREAKING NEWS

“LIC मधील डेव्हलपमेंट ऑफिसर राजेंद्र कासार दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!”

0

बार्शी |

एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करणारे राजेंद्र विठ्ठलराव कासार व सुवर्णा राजेंद्र कासार या दांपत्याच्या हस्ते १९ जानेवारी रोजी अन्नपूर्णा योजनेचे पूजन केले. राजेंद्र कासार ही गेल्या ३२ वर्षांपासून एलआयसी मध्ये कार्यरत आहेत, सामाजिक उपक्रमांमध्ये ही कासार यांचा सक्रिय सहभाग असतो. या दाम्पत्याची मुली व मुलगा हे उच्चविद्याविभूषित आहेत.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात, शहरातील युवा वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी व्याख्याने आयोजित केली जातात. राजेंद्र कासार व सुवर्णा कासार या दांपत्याच्या हस्ते आज अन्नपूर्णा योजनेचे पूजन व वितरण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.