Latest Marathi News

BREAKING NEWS

लालबागच्या राजासाठी यंदा साकारणार अयोध्या, कोरोनानंतर होणार दर्शनासाठी मोठी गर्दी

0

 

कोरोनाच्या संकटानंतर सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध मंडळापैकी एक आहे तो लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या आगमनाची तयारी देखील जय्यत तयारी सुरू आहे यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे कलाकृती साकारत आहेत.

लालबागच्या राजा हा मुंबईसह देशविदेशातील करोडो गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती या लालबागच्या राजाची आहे. लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. यासह येथील देखावे देखील नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण आणि एका थीम वर आधारीत असतात. यंदा लालबागचा राजा मंडळ अयोध्येतील राम मंदीराच्या थीमवर आधारीत देखावा साकारणार आहे.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळात अयोध्येतील राम मंदीराची प्रतिकृती साकारली जाणार आहे. मंडळाच्या प्रवेशद्वारावरच राममंदीराची प्रतिकृती आणि प्रभु श्रीरामाची प्रतिमा असणार आहे. तर मुख्य मूर्तीच्या स्थापनेच्या ठिकाणी राममंदीराच्या घुमटची प्रतिकृती असणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडून ही कलाकृती साकारण्यात येत आहे. यामुळे ही कलाकृती नक्कीच भव्य आणि आकर्षक असणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.