Latest Marathi News

BREAKING NEWS

कोविड काळातील कमाईचा हिशोब द्या; किरीट सोमय्यांचा सवाल

0

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करत खळबळ उडवली आहे. सुजित पाटकर यांना संजय राऊत यांचा पार्टनर म्हणत कोविड काळातील कमाईचा हिशोब द्या, असे ते म्हणाले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने २०२० मध्ये सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला सुमारे अर्धा डझन मेगा कोविड सेंटर चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे संजय राऊत यांचे पाटनर सुजित पाटकर यांनी कोवीडमध्ये कमाई केल्याचा जवाब द्या. बोगस बिलांविरुद्ध २.३२ कोटी भरले. ते पैसे कुठे गेले? लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने बेनामी खात्यात १४ कोटी हस्तांतरित केले त्याचे पैसे कुठे गेले? असे प्रश्न विचारले आहेत. या पूर्वी सुद्धा किरीट सोमय्या यांनी थेट सुजित पाटेकर यांच्यावर अनेक आरोप लगावले होते.

१०० कोटींच्या कॉन्ट्रॅक्टसाठी ६००० वैद्यकीय आणि अर्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. त्यावेळेला लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडे त्यांच्या पॅरोलवर फक्त १८ कर्मचारी होते. १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देताना ही कंपनी अस्तित्वातच नव्हती, असा आरोपही त्यांनी केला होता. आता या आरोपांना उद्धव ठाकरे गटाचे नेते काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.