Latest Marathi News

BREAKING NEWS

कोथळा काढायचं म्हणताय, आयुष्यात तुम्ही कोणाला चापट तरी मारली आहे का?; एकनाथ शिंदे

0

शिवसेना ही एकट्या दुकट्याची नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलेन गेट आउट…मी असाच पायऱ्या उतरून घरी निघून जाईन, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच हॉस्पिटमध्ये असताना ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही, हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्दे घेत पलटवार केला. आम्ही कोणत्याही शिवसैनिकाला त्रास दिला नाही. आम्हाला कुणावरही अशा प्रकारचा अन्याय करुन प्रवेश करुन घ्यायचा नाही हे मी जाहीरपणे सांगतो. निष्ठावंत शिवसैनिकांनी सांगावं, पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण आता इमोशनल ब्लॅकमेल करता येणार नाही, अशा पद्धतीने पक्ष वाढवता येणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी भाषणात माझ्या दीड वर्षांच्या नातवावर टीका केली. पण त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करायची, काय टीका करायची हे समजत नाही. पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या. आमचे कोथळे काढणार असं ते म्हणाले, आयुष्यात कुणाला एक चापट तरी मारलीय का?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला..

दिघे साहेब जेव्हा गेले तेव्हा मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुम्ही दिघे साहेबांनी काय केलं? त्यांनी कसा पक्ष वाढवला? आता ठाण्यात पक्ष कसा वाढवता येईल? असं तुम्ही मला विचाराल असं वाटलं होतं. पण तुमचा पहिला प्रश्न आनंद दिघेंची प्रॉपर्टी किती आहे आणि कुणाकुणाच्या नावावर आहे ते तुम्ही विचारलंत. हे ऐकून मला धक्काच बसला होता. बाळासाहेबांची शपथ घेऊन मी हे सांगतो. आजवर मी हे बोललो नाही. मी खोटं बोलून सहानुभूती मिळवणारा नाही. आनंद दिघेंचं साधं बँकेत खातंही नव्हतं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.