Latest Marathi News

BREAKING NEWS

“कोश्यारीजी, कंबोज-सोमय्या यांच्यासारखे लोक मुंबईतून हाकलून लावा, आमच्या इथली घाण साफ होईल”

0

 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक गेले तर काहीच उरणार नाही. आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्यासारखे लोक मुंबईतून हाकलून लावा. हे लोक महाराष्ट्राचा अपमान करतात.त्यांचं इथं काहीही काम नाही. ते गेले तर आमच्या मुंबईतील घाण साफ होईल असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी यांनी लगावला होता.

नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना जर त्यांचा पुळका असेल तर त्यांना दिल्लीला घेऊन जावं. त्यांना सांभाळावं. इथे राहून ते केवळ बेछूट आरोप करत असतात. आता असले उद्योग त्यांनी बंद करावेत”, असं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत. विद्या चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना आपलं मत मांडलं.

सोलापुरात कंबोज यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं त्यावर विद्या चव्हाण यांना विचारण्यात आलं तेव्हा मोहित कंबोज सारख्या लोकांना जोडे नाही मारणार तरा काय करणार?, असं चव्हाण म्हणाल्या आहेत. कंबोज तु किरीट सोमय्याचा बाप बनायला लागला की की?, असा सवालही विद्या चव्हाण यांनी विचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.